बेळगाव तालुक्यातील सोनट्टी गावात सुनील पाटील नामक व्यक्तीच्या मालकीच्या फार्म हाऊस मध्ये वाचमन म्हणून काम करणाऱ्याचा खून करण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास झोपलेल्या ठिकाणी त्याचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. लक्ष्मण नानाप्पा हलगनावर वय 45 रा. हंनिकेरी बैलहोंगल असे या घटनेत मयत झालेल्या इसमाचे नाव आहे.
सुनील पाटील यांची मालकी असलेल्या फार्म हाऊस मधील शेतीत सदर व्यक्ती शेतात काम करत होती व वाचमन म्हणून देखील रहात होती.मंगळवारी रात्री लक्ष्मण झोपलेल्या ठिकाणी शेतातील घरच्या पहिल्या माडीवर गळा दाबून खून करण्यात आला आहे.त्यांच्यामुलाने काकती पोलिसात खून झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.
घटनास्थळी काकती पोलिसांनी भेट देऊ पंचनामा केला आहे.पैश्याच्या व्यवहारात किंवा अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.काकती पोलीस निरीक्षक आर हळळूर अधिक तपास करत आहेत.