कोरोना प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी शासनाने चालविलेल्या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या उद्देशाने मुंबई येथे ते वास्तव्यास असणारे बेळगावचे सुपुत्र डॉ. सुहास गोडबोले यांनी बेळगांव परिसरात आर्सेनिक अल्बम -30 या रोगप्रतिकारक औषधी गोळ्यांच्या एकूण सुमारे 3 हजार बाटल्यांचे मोफत वितरण केले आहे.
डॉ. सुहास गोडबोले यांच्याकडून बेळगांव शहराच्या सर्व पोलिस ठाण्यांमध्ये शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारे आर्सेनिक अल्बम 30 हे होमिओपॅथिक औषध देण्यात आले. डॉ. गोडबोले व यांची कन्या वेदांती गोडबोले यांनी बेळगांव पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांना भेटून प्रथम त्यांचा सत्कार केला. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आर्सेनिक अल्बम -30 या औषधी गोळ्यांच्या 1500 बाटल्या यांच्याकडे सुपूर्द केल्या.
याप्रसंगी कोरोनाच्या काळात बेळगांव पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेसाठी केलेल्या कार्याची डॉ. सुहास गोडबोले यांनी प्रशंसा केली.
पोलीस खात्याप्रमाणे डॉ. गोडबोले यांनी बेळगांव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी आणि कामगारांसाठी 500 बाटल्या आर्सेनिक अल्बम देऊ केले. त्यांनी बेळगांव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्चस्वा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या रोगप्रतिकारक औषधी गोळ्यांच्या बाटल्या सुपूर्द केल्या. याव्यतिरिक्त बेळगाव नजीकच्या सुमारे 4,500 लोकसंख्या असणाऱ्या खेमलापुर या गावामध्ये डॉ. गोडबोले यांच्यातर्फे आर्सेनिक अल्बम 30 औषधाच्या 750 बाटल्यांचे मोफत वितरण करण्यात आले. गावकऱ्यांच्या हितार्थ डॉ. सुहास गोडबोले यांनी राबविलेल्या या उपक्रमासाठी सुनील पाटील यांचे सहकार्य लाभले.
डॉ. सुहास गोडबोले हे विक्रोळी -मुंबई येथे वास्तव्यास असले तरी ते मूळचे बेळगांवचे आहेत. मुंबईमध्ये रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचे बेळगांव येथे देखील रुग्ण आहेत. त्यामुळे दर महिन्याच्या अखेरी बेळगांवला येऊन ते रुग्णसेवा करत असतात. डॉ. गोडबोले यांनी निरपेक्ष वृत्तीने जनहितार्थ रोग प्रतिकारक औषधी गोळ्यांच्या मोफत वितरणाचा उपक्रम राबविल्याबद्दल पोलीस आयुक्तांसह संबंधित सर्वांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.