कोविड काळात काळ्या दिनाची मूक सायकल फेरी बाबत शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक जत्तीमठात झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी होते.
बैठकीत काळा दिन कसा पाळावा या संदर्भात चर्चा झाली अनेक उपस्थित कार्यकर्त्यांनी अनेक योजना सांगितल्या व या योजनांवर विचार करण्यात आला.बैठकीत कार्यकर्त्यांनी मांडलेल्या विचार घेता काळ्या दिना बाबत सर्वसमावेशक असा निर्णय घेतला जाईल असे मत दिपक दळवी यांनी व्यक्त केले.
शहरात सुरू असलेल्या दुर्गामाता दौडच्या धर्तीवर मूक फेरी काढायला फक्त पदाधिकाऱ्यांना तरी परवानगी द्यावी अशी मागणी पोलिसांकडे मागणी करावी याबाबत चर्चा झाली. गेल्या 60 हुन अधिक वर्षे चाललेली चळवळ खंड पडता कामा नये याबाबतची मागणी अनेकांनी केली.
सामाजिक अंतर राखून इन डोअर सभा घेण्याची मागणी करा अशाही सूचना कार्यकर्त्यांनी केल्या.जोवर प्रश्न सुटत नाही तोवर रस्त्यावरची लढाई लोकशाहीच्या मार्गातून सुरूच राहील असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
खानापूरमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाते त्याच घटक समित्यावर मध्यवर्ती यावर्षीच्या काळ्या दिना बाबत निर्णय लादणार नाही असे मालोजी अष्टेकर म्हणाले.
बेळगावचा लढा लोकशाही आणि भारतीय घटनेला धरून आहे याबाबत बेळगाव पोलिसांना कल्पना दिली आहे असे दिपक दळवी यांनी सांगितले.बैठकीला मध्यवर्ती म ए समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर,प्रकाश मरगाळे आदी उपस्थित होते.