*१ नोव्हेंबर २०२० काळा दिन*
अनेक वर्षे अन्याया विरोधात लढणार्या सीमा लढ्यातील मराठी जनतेत या वर्षीही आपल्या व्यथा/अन्याय, या विरोधात आपला आवाज दडपण्यात येतोय कां? असा संभ्रम आहे.
मराठी भाषकांना नेहमीच कायद्याची बंधन पाळत लढा करावा लागतो. हे सारे निर्बंध पाळत, आजपावेतो मराठी भाषकांनी लढा तेवत ठेवला आहे.
आज करोनाच्या महामारीत, मनातील आंतरिक इच्छा, आकांक्षाची पुर्तता करण्याची प्रामाणिक धडपड, चळवळ करणार्या जनतेस अस्वस्थ करत आहे, हे समिती नेतृत्वास जणवत आहे. पण या अदृष्य रोगराईत, विरोध, अंतरिक तळमळ व्यक्तही करायची आहे, मग प्रशासन कसलीही अडचण निर्माण करु दे, आपण आपला निषेध व्यक्त करायचा आहे. करणार आहोत !!!
या वर्षी समिती तमाम मराठी भाषकांना हरताळ पाळत व शक्य असेल तिथेच, नियमांचे पालन करत गटागटाने, प्रार्थना, संवाद व चर्चा सत्र आयोजित करत, आपला निषेध नोंदवावा असे तमाम जनतेस आवाहन करत आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समिती, मोजक्या कार्यकर्त्यांसह, मराठा मंदिरात खुल्या जागेत सकाळी १०.३० ते दुपारी २.०० पर्यंत धरणे धरेल व समस्त जनतेच्या भावना व्यक्त करेल. कृपया गर्दी टाळावी.
ग्रामीण भागात व वार्डा वार्डात, मर्यादित वेळेत, सर्व नियम पाळत निषेध व्यक्त करावा, संवेदनशील भागात तिथल्या नेतृत्वाने दैनंदीन व्यवहारात अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी.
*श्री दीपक दळवी*
*अध्यक्ष*- *मध्यवर्ती म.ए.समीती,बेळगाव*
तसेच सर्व मध्यवर्ती समीती पदाधिकारी व घटक म.ए.समीती अध्यक्ष,पदाधिकारी.