टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टने 52 लाख रुपये किमतीची कोविड वैद्यकीय उपकरणे बेळगाव केएलई हॉस्पिटलला दिली. गुरुवारी केएलई शताब्दी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्या उपस्थितीत हे कोविड किट, पीपीई किट आणि एन-95 मास्क केएलई रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ म्हणाले, कि लायन्स क्लबच्या वतीने सातत्याने सामाजिक कार्य करण्यात येते. मुंबईमध्येही ५२ लाख रुपये किमतीचे कोविड किट्स वितरण करण्यात आले आहेत. लायन्स चा उपक्रम स्तुत्य आहे. असे ते म्हणाले.
बेळगावमधील कोविड परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले कि, बेळगावमधील कोविड परिस्थिती आता नियंत्रणात येत असून कोविड रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. शिवाय संसर्ग होण्यामध्येही आता घट झाली असून कोरोनाबाबतच्या सर्व खबरदारी नागरिकांनी पाळाव्यात आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला डॉ. नागराज बैरी, डॉ. पी. आर. एस. चेतन, डॉ. गिरीश कुचनाड, जिल्हा वैद्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याला, श्रीकांत मोरे, सुग्ग्गला यलेमळी, डॉ. आर. एस. मुधोळ, डॉ. अरविंद तेनगी, सुभाष हेब्बळी, जुनेद तोपीनकट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.