बांधकाम कामगारांना विविध सोयी – सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी बांधकाम कामगार आणि मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
बेळगाव जिल्ह्यात ११ लाखाहून अधिक बांधकाम कामगार आहेत. या कामगारांसाठी रोजगार हमी योजनेंतर्गत भारत सरकारने २०१३ साली कायदा अंमलात आणला असून या योजनेंतर्गत कामगार कार्डचे वितरण करण्यात येते. अनेक कामगारांनी या कार्डसाठी अर्ज केला असून प्रत्येकवर्षी कार्ड नूतनीकरणासाठीही अर्ज केले आहेत. परंतु आजपर्यंत अनेक कामगार या कार्डपासून वंचित आहेत. या कार्डच्या माध्यमातून अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. परंतु हे कर्डक उपलब्ध नसल्याने बांधकाम कामगार अडचणीत आले आहेत.
प्रत्येक वर्षी अनेक नवीन कामगार या कार्डसाठी अर्ज करतात. परंतु जुन्या अर्जांसहित नव्या अर्जावरही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वतीने ९० दिवसांचा रोजगार दिला जातो. परंतु गेले कित्येक दिवस १५ ते २० दिवसांच्या वर रोजगार मिळत नाही. त्यामुळे ९० दिवस हजेरी भरत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने ९० दिवस काम द्यावे यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यासह हे काम झाल्यावर तातडीने कार्ड वितरित करण्यात यावेत, कामगारांना मिळणाऱ्या सरकारी सुविधा, वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात, रेशन किटचे वितरण करण्यात यावे, नव्या कामगारांची नोंदणी करून घ्यावी, सहाय्य्य धन म्हणून रुपये ५००० देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. यावेळी अनेक बांधकाम कामगार उपस्थित होते.