Friday, December 27, 2024

/

डीसीसी बँक निवडणुकीत उतरल्या आम. अंजलीताई निंबाळकर

 belgaum

राजकीय वर्तुळात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या डीसीसी बँकेवर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी एंट्री मारली आहे. आज सकाळी ११ वाजता त्यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला असून बिनविरोध निवडून येण्याचा निश्चय केला आहे.

अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या आमदार निंबाळकर यांनी सहकार क्षेत्रात पाऊल टाकले असून तालुक्यातील कृषीपत्तीन संघ क्षेत्राच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी हा अर्ज भरला आहे.

आमदार अंजली निंबाळकर यांच्या डीसीसी बँकेच्या निवडणुकीतील एन्ट्रीमुळे निवडणुकीची दिशा बदलण्याचे चिन्ह दिसत आहे. मात्र अंजलीताई यांना खानापूर मधून माजी आमदार अरविंद पाटील यांचे तगडे आवाहन असणार आहे.

निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून चिकोडी तालुक्यातून गणेश हुक्केरी हेही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होत आहे.

त्याचप्रमाणे आज दिवसभरात दहा तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीचा अर्ज भरण्याची शक्यता आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून उमेदवारी मागे घेण्यासाठी उद्याचा दिवस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.