प्रत्येक वर्षी ज्योती कॉलेज मैदानावर मोठ्या आणि भव्य प्रमाणात साजरा होणारा सीमोल्लंघन कार्यक्रम आज अगदी सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ज्योती कॉलेज मैदानावर तुडुंब गर्दीत साजरा होणार हा सोहळा आज कोविड पार्श्वभूमीवर अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यंदाचा दसरोत्सव राडा झाला असल्याची माहिती सर्वत्र पसरली होती. परंतु परंपरेला फाटा न देता कोविड च्या पार्श्वभूमीवर शहर देवस्थान समितीच्या माध्यमातून प्रशासनाशी संपर्क साधून आणि चर्चा करून सध्या पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यासाठी परवानगी घेण्यात आली होती. प्रशासनातर्फेही कोविड मार्गसूचीचा अवलंब करून हा सोहळा साजरा करण्यासाठी अनुमती दिली होती. याचप्रमाणे आज देवदादा सासन काठी आणि देवस्थान पालखी दुपारी ज्योती कॉलेज मैदानावर दाखल झाली.
यावेळी आमदार अनिल बेनके म्हणाले, प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा दसरोत्सव यंदा कोविड पार्श्वभूमीवर सध्या पद्धतीने आणि प्रशासनाच्या मार्गसूचीनुसार पार पाडला जात आहे. सुरुवातीला दसरोत्सवावर प्रशासनाने निर्बंध घातले होते. परंतु देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुसकर आणि इतर मान्यवरांच्या प्रयत्नाने हा परंपरागत साजरा होणारा सण सध्या पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रशासनाची परवानगी मिळविली. आणि परंपरा खंडित न करता आजचा दसरोत्सव साजरा होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील म्हणाले कि, यंदा दसरोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार नाही. परंतु अनेक वर्षांची परंपरा जपण्यासाठी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आम्ही हा सोमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पाडत आहोत. प्रशासनाने ठरवून दिल्याप्रमाणे कोविड मार्गसूचीनुसार सर्व नियम पळून हा उत्सव साजरा होत आहे.
संपूर्ण जगावर आलेले संकट लवकरात लवकर टळूदे यासाठी देवीकडे साकडे घालण्यात आले असून, या कार्यक्रमानंतर कोणत्याही देवस्थानाच्या पालखी या मैदानावर येण्यासाठी परवानगी नसून, हे मैदान सील करण्यात येणार आहे. शिवाय यंदा देवस्थान समितीच्या निर्णयाला समस्त शहरातील देवस्थानांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमानंतर परंपरेप्रमाणे आरती म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ही सासनकाठी पुन्हा चव्हाट गल्ली येथे रवाना झाली.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आमदार अनिल बेनके यांचे सहकार्य लाभल्यामुळे शहर देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अनिल बेनके, देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुसकर, सुनील जाधव, चव्हाट गल्ली येथील पंचमंडळी, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1241530502871207/