पर्जन्यमान खात्याने बेळगांव जिल्ह्यातील ऑक्टोबर महिन्यातील आजपर्यंतची पावसाची आकडेवारी जाहीर केली असून यामध्ये 243.9 मि.मी. इतका सर्वाधिक एकूण पाऊस हक्केरी एसएफ येथे तर सर्वात 7.5 मि.मी. इतका कमी पाऊस कित्तूर येथे नोंदविला गेला आहे.
बेळगांव जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हक्केरी तालुक्यात नोंदविला गेला असला तरी मुसळधार पावसासाठी सुपरिचित असलेल्या खानापूर तालुक्यात मात्र 1 ते 12 ऑक्टोबर 2020 या कालावधीत अवघ्या 20.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात हक्केरी खालोखाल अनुक्रमे मुडलगी (131.9), बेळगांव (120.4), बैलहोंगल (99.8), व निपाणी (99.7) येथे अधिक प्रमाणात पाऊस नोंदविला गेला आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पर्जन्यमापन केंद्रांमध्ये नोंदविला गेलेला अनुक्रमे सर्वसामान्य पाऊस आणि ऑक्टोबर महिन्यातील आत्तापर्यंतचा एकूण पाऊस याची नोंद खालीलप्रमाणे आहे.
अथणी एचबीसी (103 -96.6 मि.मी.), बैलहोंगल आयबी (123 -99.8) बेळगांव आयबी (136 -120.4), चिक्कोडी (114 -63.4), गोकाक (104 -41.3) हुक्केरी एसएफ (133 -243.9), कागवाड /शेडबाळ (82.6 -50.6), खानापूर (136 -20.6), कित्तूर (107.2 -7.5), मुडलगी (95.8 131.9), निपाणी आयबी (99.7 -105.4), रायबाग (91 -55.7), रामदुर्ग (109 -68.3) आणि सौंदत्ती (112 -96.4).