हिरेबागेवाडी येथे विस्तारित जागेत उभारण्यात येणाऱ्या राणी चन्नम्मा विद्यापीठासाठी १०० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
हिरेबागेवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या विद्यापीठाच्या नवीन परिसरासाठी पहिल्या टप्प्यातील अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
आज हिरेबागेवाडी येथे विद्यापीठाच्या जागेची पाहणी करण्यासाठी ते आले होते. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
यापूर्वी १२७ एकर विस्तीर्ण जागा ही विद्यापीठासाठी मंजूर करण्यात आली आहे. शैक्षणिक आणि विद्यापीठ प्रशासनाचे केंद्र या नव्या इमारतीमध्ये सुरु करण्यात येणार असून इतर अभ्यासक्रम जुन्या विद्यापीठातच सुरु राहणार आहेत.
हिरेबागेवाडी येथे पाहणी दौऱ्यासाठी आलेल्या अश्वथनारायण यांना येथील स्थानिकांनी विद्यापीठाच्या विस्तारीकरणासाठी अधिक जागा देण्याचीही तयारी दर्शविली.