मलबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी शाॅपतर्फे फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सहकार्याने बैलूर नजीकच्या गवळीवाडा आणि चिखले नजीकच्या आमगांव (ता. खानापूर) येथे जीवनावश्यक साहित्यांच्या रेशन किट्सचे वाटप करण्याचा उपक्रम नुकताच पार पडला.
मलबार गोल्ड अँड डायमंड आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील बैलूरनजीकच्या गवळीवाडा आणि चिखलेनजीकच्या आमगांव येथील एकूण 70 गरीब गरजू कुटुंबांना रेशन किट्सचे वितरण करण्यात आले.
या कुटुंबांपैकी 46 कुटुंबे गवळीवाडा येथील असून 24 कुटुंबे आमगांव येथील आहेत. त्यांना देण्यात आलेल्या रेशन किटमध्ये सोनामसुरी तांदुळ, सनप्युअर खाद्यतेल, आशिर्वाद आटा, तूरडाळ आणि साखर यांचा समावेश आहे.
“एक तास आपल्या राष्ट्रासाठी” या शीर्षकाखाली राबविण्यात आलेल्या उपरोक्त उपक्रमाप्रसंगी मलबार गोल्ड अँड डायमंडचे स्टोअर मॅनेजर सुरज अनवेकर, विक्री अधिकारी आनंद बुलबुले, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, प्रशांत बिर्जे, गणेश प्रभू, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण झंजारे, काळू थोरवत, अर्जुन गावडे आदींसह गवळीवाडा व आमगांवचे प्रमुख उपस्थित होते.