Monday, January 6, 2025

/

मांजात अडकलेल्या घारीला वनखात्याने दिले जीवदान

 belgaum

झाडाच्या उंच फांदीवर पतंगाच्या मांजाच्या दोऱ्यात अडकून पडलेल्या एका घारीला वनखात्याच्या पथकाने जीवदान दिल्याची घटना आज फोर्टरोड येथे घडली.

याबाबतची माहिती अशी की, फोर्ट रोडवरील देशपांडे पेट्रोल पंप समोर असणाऱ्या मशिदी शेजारील एका झाडाच्या उंच फांदीवर एक घार पतंगाच्या मांजामध्ये अडकून असहाय्यपणे लोंबकळत पडली होती.

गेल्या चार दिवसापासून ही घार त्याठिकाणी लटकत असल्यामुळे ती मृत झाली असावी असा आसपासच्या नागरिकांचा समज झाला होता. तथापि आज सकाळी देसाई नामक एका व्यक्तीने या घारीबाबत वनखात्याचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर एस. व्ही. मगदूम यांना माहिती दिली.

Egale bird saved
Egale bird saved

सदर माहिती मिळताच आरएफओ मगदूम यांनी डीआरएफओ व्ही.एस. गोडर व फॉरेस्ट गार्ड एम. जी. शिगीहळ्ळी यांच्यासमवेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच झाडावर चढण्यात तरबेज असणार्‍या एका व्यक्तीकडून उंच झाडावर अडकून पडलेल्या त्या असहाय्य घारीची पतंगाच्या मांजातून सुखरूप सुटका केली.

त्यानंतर जखमी मरणासन्न अवस्थेतील त्या घारीला तात्काळ पशुचिकित्सालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या पद्धतीने वनखात्याने एका घारीला जीवदान दिल्यामुळे उपस्थित पशुपक्षी प्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.