बेळगांवच्या कोरोना तपासणी प्रयोगशाळेमध्ये गेल्या सात दिवसात दररोज दीड हजारहून अधिक या पद्धतीने स्वॅबच्या एकूण 14 हजार 638 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून दिलासादायक बाब ही आहे की या नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या नमुन्यांचे प्रमाण गेल्या दोन दिवसात झपाट्याने घसरले आहे.
बेळगांवच्या कोरोना तपासणी प्रयोगशाळेत गेल्या 20 ऑक्टोबर रोजी तपासणीस आलेल्या स्वॅबच्या नमुन्यांपैकी 3.18% नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह होता. या उलट काल सोमवारी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी अवघ्या 1.58 टक्के नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना तपासणी प्रयोगशाळेमध्ये गेल्या दि. 20 ते 26 ऑक्टोबर 2020 या कालावधीत दररोज तपासण्यात आलेल्या स्वॅबच्या नमुन्यांची संख्या, त्यापैकी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या नमुन्यांची संख्या आणि पॉझिटिव्ह आढळून आलेल्या नमुन्यांचे टक्केवारीमध्ये प्रमाण अनुक्रमे खालील प्रमाणे आहे.
दि. 20 ऑक्टोबर : तपासलेले स्वॅब नमुने 2799, आढळलेले पॉझिटिव्ह नमुने 89, पॉझिटिव्ह प्रमाण 3.18 टक्के. दि. 21 ऑक्टोबर : तपासलेले स्वॅब नमुने 2115, आढळलेले पॉझिटिव्ह नमुने 65, पॉझिटिव्ह प्रमाण 3.07 टक्के. दि. 22 ऑक्टोबर : तपासलेले स्वॅब नमुने 1744, आढळलेले पॉझिटिव्ह नमुने 61, पॉझिटिव्ह प्रमाण 3.50 टक्के. दि. 23 ऑक्टोबर : तपासलेले स्वॅब नमुने 2148, आढळलेले पॉझिटिव्ह नमुने 80, पॉझिटिव्ह प्रमाण 3.72 टक्के. दि. 24 ऑक्टोबर : तपासलेले स्वॅब नमुने 1896, आढळलेले पॉझिटिव्ह नमुने 73, पॉझिटिव्ह प्रमाण 3.85 टक्के. दि. 25 ऑक्टोबर : तपासलेले स्वॅब नमुने 2417, आढळलेले पॉझिटिव्ह नमुने 46, पॉझिटिव्ह प्रमाण 1.90 टक्के. दि. 26 ऑक्टोबर : तपासलेले स्वॅब नमुने 1519, आढळलेले पॉझिटिव्ह नमुने 24, पॉझिटिव्ह प्रमाण 1.58 टक्के.
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 24 हजार 452 वर पोचली आहे, यापैकी 23 हजार 392 जण कोरोना मुक्त होऊन पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 732 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळ्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. दरम्यान रुग्ण संख्या घटल्यामुळे आरोग्य खात्यावरील ताण सध्या कमी झाला आहे.