जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत आता कमी जाणवत आहे. अजूनपर्यंत कोरोनावरील लस उपलब्ध झाली नाही. जनतेचे एक पाऊल धोक्याचे बनू शकते, यामुळे प्रत्येकाने खबरदारी बाळगावी, असे आवाहन बेळगाव जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. एच. व्ही. मुन्याळ यांनी केले आहे.
शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले कि, बेळगावमधील कोविड रुग्णांच्या संख्येत तसेच कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणातही घट झाली आहे. परंतु जनतेने अजूनही जागरूक राहिले पाहिजे.
अजूनपर्यंत बाजारात यावरील लस किंवा औषध उपलब्ध झाले नाही. येणाऱ्या काळात अनेक सण आहेत. कोरोना पर्व सुरु झाल्यापासून प्रत्येक सण हा सध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.
येत्या काळातही लस उपलब्ध होईपर्यंत जनतेने सावधगिरी बाळगली पाहिजे. किंचित दुर्लक्षही झाले तर ते महागात पडू शकेल. सुरक्षेच्या उपाययोजनांसह जनतेने सण साजरे करावेत, असे आवाहन त्यांना केले आहे.