Monday, December 23, 2024

/

“या” सायकल ट्रॅकच्या सुधारणेसाठी 49.94 लाखाची निविदा

 belgaum

बेळगांव स्मार्ट सिटी लिमिटेडने अशोक सर्कल ते हॉटेल सुरभी कणबर्गी रोडपर्यंतच्या सायकल ट्रॅक सुधारणेच्या कामासाठी 49 लाख 94 हजार रुपये खर्चाची निविदा काढली आहे.

सदर सायकल ट्रॅक सुधारणेच्या कामामध्ये रोड मार्किंग, पेव्हमेंट मेकर्स, रेट्रोरिफ्लेक्टींग साईन बोर्ड, हम्प्स, रंबल स्ट्रिप्स आणि त्यांच्या सबध्द कामाचा समावेश असणार आहे.

यापूर्वी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने अशोक सर्कल ते कनकदास सर्कल मार्गे सुरभी हॉटेल पर्यंतचा फुटपाथ आणि सायकल ट्रॅक (नॉन मोटरव्हेईकल पाथ) बांधण्यासाठी 6 कोटी 30 लाख 57 हजार 201.14 रुपये किंमतीची निविदा काढली होती.Cycle track

हे विकासकाम पूर्ण झाले झाले असून आता सुधारणेचे काम हाती घेण्यात येणार आहे. कनकदास सर्कलमार्गे सुरभी हॉटेल पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथ आणि सायकल ट्रॅक असणार आहे.

सदर मार्गाच्या एका बाजूला तलाव असल्यामुळे एकदा का सुधारणेचे काम पूर्ण झाले की या मार्गावरून सायकलवर फेरफटका मारण्याचा आनंद काही औरच असणार असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.