Thursday, February 6, 2025

/

बेळगावमधल्या काँग्रेस कॅंटीनमधली अशी आहे मेजवानी

 belgaum

बेळगावमध्ये संगोळी रायन्ना सर्कल जवळ असलेल्या काँग्रेस भवनच्या नूतन इमारतीत काँग्रेस कॅंटीनचे उदघाटन करण्यात आले. या कॅंटीनचे उदघाटन केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

उदघाटनानंतर बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी म्हणाले कि, संगोळी रायन्ना सर्कल जवळील काँग्रेस पक्षाच्या नूतन इमारतीत हे कँटीन सुरु करण्याचे मुख्य उद्दिष्ट हे येथे येणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच जनसामान्यांना माफक दरात अन्न उपलब्ध करून देण्याचे आहे. या कॅंटीनमध्ये शुद्ध शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून ५० टक्के सवलतीच्या दरात येथील जेवण उपलब्ध असणार आहे.

भुकेल्यांना ५० टक्के सवलतीच्या दरातील जेवण हे नक्कीच फायदेशीर ठरावे या संकल्पनेतून काँग्रेस कँटीनची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.Congress canteen

माफक दरात स्वच्छ आणि रुचकर जेवणाची मेजवानी या कॅंटीनमध्ये मिळणार असून अन्नाचा दर्जाही उत्तम राखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, हे कँटीन ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल, अशी आशा सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.

या कॅन्टीनच्या उदघाटनप्रसंगी सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर यांच्यासह काँग्रेसचे मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.