बेळगांव स्मार्ट सिटी लिमिटेडचे माय बेळगाव सिटिझन्स ॲप गुगल प्लेवर जनतेच्या सेवेसाठी रुजू झाले असून नागरिकांनी त्याचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या ॲप मधील “माय ग्रिव्हीयन्सी” बटनाद्वारे आपण स्मार्ट सिटीच्या कामासंदर्भातील तक्रारी नोंदवू शकतो.
स्मार्ट सिटीची कामे सुरू झाल्या पासून हजारो तक्रारी वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून बेळगावातील जनतेला ऐकायला बघायला मिळत असतात.कुणी याची तक्रार स्थानिक लोक प्रतिनिधी कडे करत असतात तर कुणी जिल्हाधिकारी पालकमंत्री यांना निवेदन देतात मात्र आता स्मार्ट सिटीच्या कामांची तक्रार करण्यासाठी एक अप्प उपलब्ध झाले आहे.
माय बेळगाव सिटिझन्स ॲपमधील ग्रिव्हीयन्सी कॅटेगिरी -सब कॅटेगिरी, तक्रारीचा प्रकार (श्रेणी), उपप्रकार (सबकॅटेगरी) त्यानंतर आपल्या परिसराची (एरिया) माहिती देऊन नागरिक आपल्या तक्रारी नोंदवू शकतात.
तसेच सोबत तक्रार संबंधित छायाचित्रही जोडू शकतात. एकदा का तक्रारीची स्थिती व स्वरूप नोंदविल्यानंतर सदर ॲप स्वतःच त्या तक्रारीचे निश्चित स्थळ शोधून काढून निदर्शनास आणून देते. परिणामी संबंधित कार्यवाही करून तक्रारीचे निवारण करणे सुलभ जाणार आहे.