कर्नाटक भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी असा दावा केला आहे की, बी. एस. येडीयुरप्पा हे जास्त काळ मुख्यमंत्रीपदी राहू शकणार नाहीत.
त्यांचे उत्तराधिकारी हे उत्तर कर्नाटकातील असतील. आणि याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आहे. भाजपमधील वरिष्ठ नेत्याने केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे उत्तर कर्नाटकात दुर्लक्ष करत आहेत. त्यांना हायकमांडही कंटाळलेले आहेत असे वक्तव्य सोमवारी सायंकाळी एका कार्यक्रमात केले आहे.
येडीयुराप्पा हे कर्नाटकाचे मुख्यमंत्री नसून ते केवळ आपल्या शिमोगा जिल्ह्यापुरते मर्यादित मुख्यमंत्री असल्याची टीकाही त्यांनी केली.
त्यांच्या या खळबळजनक विधानाने कर्नाटकातील नेतृत्वबदलाच्या चर्चेला पून्हा नवे वळण मिळाले आहे.
येडीयुराप्पा हे उत्तर कर्नाटकाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. कर्नाटकात भाजपची सत्ता आहे. आणि जवळपास 100 आमदार हे दक्षिण कर्नाटकातील आहेत. परंतु तरीही मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातून निवडला जातो त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.