Wednesday, January 8, 2025

/

आत्तापर्यंत जिल्ह्यातील 22,676 जण कोरोना मुक्त, तर 327 मृत

 belgaum

बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने जाहीर केलेल्या आलेखानुसार आत्तापर्यंत बेळगांव जिल्ह्यातील 22 हजार 676 कोरोनाग्रस्त रुग्ण उपचारांती पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे सध्या जिल्ह्यात 1,073 सक्रिय रुग्ण असून आत्तापर्यंत 327 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने एका आलेखाद्वारे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या सप्टेंबर महिनाअखेर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 19,457 इतकी होती. तत्पूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ही आकडेवारी अनुक्रमे 3237 व 12,244 इतकी होती.

जिल्ह्यात या ऑक्टोंबर महिन्यात आतापर्यंत 22 हजार 676 कोरोनाग्रस्त रुग्ण उपचारांची बरे झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मागील जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये उपचारांती पूर्णपणे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अनुक्रमे 944, 9057 आणि 16,856 इतकी आहे.

सध्याच्या घडीला बेळगांव जिल्ह्यात 1,073 सक्रिय रुग्ण असून गेल्या सप्टेंबर महिन्यात ही संख्या 2311 इतकी होती. तत्पूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या अनुक्रमे 2,223 व 2,998 इतकी होती.

बेळगांव जिल्ह्यात गेल्या जुलै महिन्यापर्यंत कोरोनामुळे 70 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांची ही संख्या वाढत जाऊन ऑगस्टमध्ये 189, सप्टेंबरमध्ये 290 आणि ऑक्टोबरमध्ये आत्तापर्यंत 327 अशी झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.