बेळगावच्या विमानसेवेत दिवसेंदिवस प्रगती होत असून बेळगावमधून आता थेट अजमेरपर्यंत विमानप्रवास करता येणे शक्य होणार आहे. १० नोव्हेंबर पासून बेळगावमधून या विमानसेवेला सुरुवात होणार आहे.
या अगोदर बेळगाव मधून इंदोर मधून व्हाया विमान सेवा सुरू होती मात्र लॉक डाउन मध्ये ती सेवा बंद होती. बेळगावमधून सुरत आणि सुरतपासून किशन गड (अजमेर जवळ) ही विमान सेवा सुरु करण्यासाठी स्टार एअर डिसीजीने परवानगी दिली आहे.
१० नोव्हेंबर पासून सुरु होणारी हि विमानसेवा आठवड्यातून चारवेळा सेवेत दाखल असेल. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी बेळगाव-सुरत-किशनगड याप्रमाणे हि विमानसेवा कार्यरत असेल.
दुपारी १२ वाजता बेळगावहून सुरतसाठी स्टार एअरचे विमान उड्डाण भरणार असून १.२०.वाजता ते सुरत येथे उतरेल. त्यानंतर पुन्हा सुरतहून उड्डाण भरल्यानंतर ३.१० वाजता अजमेर जवळील किशन गड येथे उतरेल. परतीच्या प्रवासादरम्यान ३.४० वाजता किशनगड येथून उड्डाण भरून सायंकाळी ५.०० वाजता सुरत येथे पुन्हा उतरेल आणि त्यानंतर ५.३० वाजता सुरत येथून बेळगाव विमानतळावर सायंकाळी ६.५० वाजता दाखल होईल.
बेळगावमधून अजमेर ख्वाजा गरीब दर्गा येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हि विमानसेवा अत्यंत अनुकूल अशी ठरणार आहे. या शिवाय राजस्थानी समाजातील लोकांना देखील या सेवेचा लाभ होणार आहे.
स्टार एअरने यापूर्वी बेळगाव – अहमदाबाद, बेळगाव-बंगळूर, बेळगाव-इंदोर, आणि बेळगाव-मुंबई अशा विमानसेवा सुरु केल्या आहेत. त्यानंतर आता बेळगाव – अजमेर हि विमानसेवा प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु करण्यात येत आहे.