आज वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या विजयोत्सवानिमित्ताने काँग्रेच्यावतीने राहुल आणि प्रियांका यांनी आपल्या घरी उत्सवाचे आयोजन केले होते. कित्तूर चन्नम्मांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या इतिहासाचे
स्मरण केले.
कोविडच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या स्वगृही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हे राहुल आणि प्रियांका दिल्लीतील नाहीत तर बेळगावचे असून केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांची ती मुले होत.
सतीश जारकीहोळी यांचा मागोमाग आता त्यांची मुलेही हळूहळू राजकारणात सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भात बोलताना राहुल जारकीहोळी म्हणाले कि, कित्तूर राणी चन्नम्मा यांचा इतिहास मोठा आहे. स्फूर्तिदायक आहे. धैर्य आणि शौर्याने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान हे प्रेरणादायक आहे.
प्रियांका जारकीहोळी यावेळी म्हणाल्या ब्रिटिशांच्या विरोधात लढून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरराणीचा इतिहास हा संपूर्ण जगभर पोहोचला पाहिजे. यासाठी प्रत्येक भाषेत त्यांचा इतिहास प्रसिद्धीस आणला जावा, असे आवाहन त्यांनी केले. हा उत्सव केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी पार पडला.