कॅम्प परिसरातील बंगलो एरियामधील बंगल्यांची लष्कराकडून पाहणी करून अनधिकृत रित्या वापरात असलेले बंगले ताब्यात घेण्यासंदर्भातील ठरावाला आज झालेल्या बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत बोर्डाचे सदस्य साजिद शेख यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे हा ठराव नाईलाजाने पुढील बैठकीत चर्चेसाठी घेण्याचा निर्णय अध्यक्षांना घ्यावा लागला.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी परिषदेची सर्वसाधारण बैठक पार पडली. सदर बैठकीत लष्कराकडून कॅम्प नागरी वसाहतीतील बंगल्यांची पाहणी करून नियमबाह्य वापरात असलेले बंगले ताब्यात घेण्यास संदर्भातील ठराव मांडण्यात आला. याला वार्ड क्रमांक 3 चे नगरसेवक साजिद शेख यांनी तीव्र आक्षेप घेतला.
त्यांच्या या आक्षेपाला मदन डोंगरे यांच्यासह उपस्थित सर्व सदस्यांनी पाठिंबा दर्शविला. बंगले ताब्यात घेण्याचा ठराव इतका महत्वाचा असता ना तो मुख्य विषय पत्रिकेवर न घेता पुरवणी पत्रिकेवर का घेण्यात आला? असा सवालही साजिद शेख यांनी केला. त्यावेळी शेख यांचा आक्षेप मान्य करून अध्यक्ष ब्रिगेडियर चौधरी यांनी सदर विषय पुढील बैठकीत चर्चेसाठी घेतला जाईल असे सांगितले.
सर्वसामान्य गोरगरिबांच्या सोयीसाठी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये जनरल फिजिशियनसह भूलतज्ञ, रेडिओलॉजिस्ट -सोनोलॉजी, ईएनटी सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन आणि एक्स-रे टेक्निशियन यांना स्पेशल व्हिजिटवर बोलवीन याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन कॅम्प परिसरात मास्क शक्तीसाठी 250 रुपये दंड आकारण्यात संदर्भात चर्चा होऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरले परंतु याला देखील साजिद शेख यांनी सरकारच्या या नियमाची तात्काळ अंमलबजावणी न करता प्रथम येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत मास्क ची सक्ती व दंडा संदर्भात जनजागृती करावी त्यानंतर 1 नोव्हेंबर पासून दंड आकारण्यात सुरुवात करावी, अशी सूचना केली. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे ठरले.
बैठकीत व्यापारी परवाना शुल्क का संदर्भातील दुरुस्ती, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील स्वच्छतागृह, एसएफसी ग्रँट अरे विषयांवर चर्चा करण्यात आली. कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये सध्या पुरुष व महिलांसाठी एकच स्वच्छतागृह आहे. मात्र रोटरी ई -क्लबतर्फे महिलांसाठी वेगळे स्वच्छतागृह बांधून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सदर बैठकीस आमदार ॲड अनिल बेनके, छावणी परिषदेच्या उपाध्यक्षा निरंजना अष्टेकर, सीईओ बर्चेस्वा, सदस्य अल्लाउद्दीन खिल्लेदार, साजिद शेख, डॉ. मदन डोंगरे, विक्रम पुरोहित, अरेबिया धरवाडकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.