बेळगाव बार असोसिएशन अध्यक्ष पदी दिनेश एम पाटील यांची निवड करण्यात आली आहे.तत्कालीन अध्यक्ष ए जी मूडवाळमठ यांच्या निधनानंतर बार असोसिएशन अध्यक्ष पद रिक्त होते त्या जागी पाटील यांची निवड झाली आहे.
दिनेश पाटील हे सिनियर वकील म्हणून बेळगाव कोर्टात प्रॅक्टिस करत असतात त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती बार असोसिएशन अध्यक्ष पदी करण्यात आली आहे.
बार असोसिएशनच्या सदस्यांनी सर्वानुमते ही निवड केली आहे. पाटील यांनी आपल्या पदाचा पदभार देखील ग्रहण केला.
अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारताच पाटील यांनी सतत कार्यशील राहून वकिलांसाठी काम करू अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.