कोणत्याही परिस्थितीत डी सी सी बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेणार नसल्याचे खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
गुरुवारी सकाळी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी खानापूर तालुक्यातून पी के पी एस मधून अर्ज दाखल केला होता.उद्या शनिवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. माघार कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.मात्र अंजली निंबाळकर यांनी अर्ज माघार घेणार नसल्याचे सांगून सर्वांना धक्का दिलाय.
के पी सी सीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पी के पी एस च्या गटातून मतदारांचा मला भरघोस पाठिंबा असल्याने मी या निकडणूकीतून मुळीच माघार घेणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
याच खानापूर तालुक्यातुन बँकेचे विद्यमान संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनीही अर्ज दाखल केला असल्याने निवडणूक अटळ आहे.या निवडणुकीत मतदानाचा सर्व पी के पी एस सहकारी सदस्यांना आहे खानापूरात एकूण 50 मते आहेत त्यापैकी 25 हून अधिक मते असलेला उमेदवार विजयी होणार आहे.
अरविंद पाटील यांच्या मागे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी तर अंजलीताई यांच्या सतीश जारकीहोळी यांचे समर्थन आहे.आमदारकीच्या निवडणुकी नंतर अंजलीताई आणि अरविंद पुन्हा एकदा डी सी सी बँकेच्या माध्यमातून आमने सामने उभे ठाकणार आहेत.