बेळगाव तालुक्यातील आष्टे या गावातली दलित समाजाच्या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून या स्मशानभूमीबाबत अनेकवेळा उपविभाग दंडाधिकारी, समाज कल्याण विभाग तसेच अनेक अधिकाऱ्यांना याबाबतीत डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघ, शाखा अष्टेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे. परंतु आजपर्यंत कोणत्याही विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरविले नाही, याविरोधात आज महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
मागील २ महिन्यांपासून सातत्याने आष्टे गावातील दलित स्मशानभूमीसंदर्भात अनेक सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदनांद्वारे माहिती पुरविली आहे. तसेच आष्टे गावातील दलित समाजाच्या स्मशानभूमीबाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. परंतु अधिकारी वर्गाच्यावतीने हेतुपुरस्सर या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून दलित समाजावर हा अन्याय होत आहे. वारंवार मागणी करण्यात येऊनही कोणीही आमची मागणी पूर्ण केली नाही.
येत्या ३ ते ४ दिवसात याबद्दल कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही, तर कायदेशीर रित्या लढा देऊन या स्मशानभूमीसाठी उपविभाग अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर सामाजिक अंतर राखून धरणे सत्याग्रह करण्याचा इशारा डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघ, शाखा अष्टेच्या वतीने देण्यात आला आहे.
हे निवेदन सादर करताना लक्ष्मण कोलकार, अशोक कोलकार, सागर कोलकार, चंद्रकांत कोलकार, मारुती कोलकार, साहिल मेत्री, लक्ष्मण मेत्री, उमेश कोलकार, संतोष कोलकार, शिवानंद कोलकार, विशाल कोलकार, दशरथ कोलकार, उत्तम कोलकार, बसू कोलकार, भरत कोलकार, गोविंद मेत्री, शंकर दोडमानी, भरतेश दोडमनी, नारायण मेत्री, राजशेखर मेत्री, अशोक कोलकार, संदीप मेत्री आदी उपस्थित होते.