कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाग्रस्त रुग्ण तसेच कोरोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांसाठी केएलई शताब्दी चॅरीटेबल हॉस्पिटलच्यावतीने ‘सन्मित्र’ आरोग्य सहाय्यवाणीची सुरुवात करण्यात आली आहे. या सहाय्यवाणी अंतर्गत हॉस्पिटलमधील डॉक्टर्स रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणार आहेत.
या सहाय्यवाणी अंतर्गत नागरिकांना थेट तसेच वॉट्सअप च्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. यामध्ये प्रसिद्ध डॉक्टर बि. एस. महांतशॆट्टी, डॉ. अमित भाटॆ, डॉ. अमर पाटील, डॉ. श्रीकांत मेत्रि, डॉ. मॊहम्मद जिया गुत्ति, डॉ. गुरुराज उडचनकर, डॉ. राजेश्वरी कड्कोळ, डॉ. दर्शीत शॆट्टी, डॉ. सतीश धामनकर, डॉ. गीतांजलि तॊटगी , डॉ. मुक्ता अलकुंटॆ, डॉ. विकास जि, डॉ. ऎम ऎस कड्डि, डॉ. सोम्या वेर्णॆकर, डॉ. अनिता मॊदगि, डॉ. बसवराज कॆ, डॉ. संतोष कुमार कॆ, डॉ. अंतोनियो करवाल्हॊ, डॉ. कोस्थुभ गोसावी, डॉ. नितिन पि, डॉ. आर ऎन पाटील, डॉ. वि डी कॊळ्वॆकर आणि डॉ. संतोष पाटील यांचा सहभाग असणार आहे.
दि. २८ सप्टेंबर २०२० ते दि. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सोमवार तॆ शनिवार सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत, ई मेल, वाट्सप किंवा फोनद्वारे संपर्क साधून डॉक्टरांशी संवाद साधू शकतो.
अधिक माहितीसाठी ई मेल: [email protected] , व्हाट्सअप नं: ८५५०८८७७७७, दूरध्वनी क्रमांक : 0831-2413777#१२३७ यावर संपर्क साधावा असे आवाहन कॆऎल्इ संस्थॆचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरॆ, युएस्एम केएलईचे निर्देशक डॉ. एच. बी. राजशेखर आणि कॆऎलइ शताब्दि चॅरिटेबल हॉस्पिटलचे निर्देशक डॉ. एस. सी. धारवाड यांनी केले आहे.