बेळगाव येथील एका वृद्ध महिलेला श्वासाचा त्रास सुरू झाल्याने तिला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र योग्य उपचार मिळत नसल्याचे कारण पुढे करून आणि संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी बीम्स विरोधात उद्रेक करत आपत्कालीन विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांना मारहाण केली आहे.
हा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला आहे. यामुळे पुन्हा एकदा बिम्सच्या विरोधात उद्रेक दिसून आला. सिविल हॉस्पिटलमध्ये वारंवार डॉक्टरांवर हल्ले सुरू आहेत.
संबंधित महिला दगावल्याने दोन डॉक्टर व एका महिला डॉक्टरवर हल्ला करण्यात आला आहे. याबाबत आता तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. बिम्स मधील आंधळ्या कारभारा बरोबरच येतील डॉक्टर उद्धटपणा करत असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान डॉक्टरवर वारंवार हल्ले बिम्स प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. याआधीही असे प्रकार घडले आहेत. आता याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रुग्णांना योग्य उपचार द्यावेत अशी मागणी होत आहे. बिम्स मधील आंधळ्या कारभारामुळे मध्यंतरी रुग्णवाहिका पेटवून नातेवाईकांनी उद्रेक केला होता.
आता पुन्हा नातेवाईकांनी डॉक्टरांना जाब विचारून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि बिम्समधील कारभार सुधारावा अशी मागणी होत आहे.