कोरोना महामारी सुरू झाल्यापासून समाजजीवन नातेसंबंध बदलून गेलेत.नाते,प्रेम,आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या व्याख्या बदलून गेल्या आहेत.
कोरोनाने मृत झालेल्या किंवा कोरोना झालेल्या व्यक्ती जवळ जाण्याचे धाडस घरचे लोक करत नाहीत.कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींचे अंत्यविधी करण्यास घरच्या लोकांनी नकार दिल्यामुळे अंत्यविधी देखील सामाजिक कार्यकर्त्यांना करावे लागत आहेत.
अशी परिस्थिती असताना बेळगावातील माधुरी जाधव या करत असलेले कार्य पाहिले तर तुम्ही त्यांना एक सॅल्यूट नक्की द्याल.
रुग्णांना रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला पोचवण्याचे कार्य हेल्प फॉर निडीच्या कार्यकर्त्या माधुरी करत आहेत.रुग्ण कोरोना पॉजीटिव्ह आहे की निगेटिव्ह याचा विचार न करता त्या सरळ रुग्णाच्या घरी जातात आणि त्याला रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला नेऊन सोडतात.
अनेक कोरोना रुग्णांना देखील त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडले आहे.
माधुरी जाधव या हेल्प फॉर निडी संस्थेच्या कार्यकर्त्या आहेत.काही दिवसांपूर्वी संस्थेचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर गावात नसताना अचानक एका रुग्णाला घरातून दवाखान्यात न्यायचे होते.त्यावेळी पहिलेदा माधुरी जाधव यांनी रुग्णवाहिकेतून महिला रुग्णाला नेऊन हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडले.
तेव्हापासून रुग्णवाहिकेतून रुग्णांना हॉस्पिटलला न्यायची तसेच मृतदेह नेण्याची जबाबदारी त्या समर्थपणे पार पाडत आहेत.कोरोनाचे नाव ऐकल्यावर आज भलेभले मागे सरकतात.
अशा परिस्थितीत धाडसाने कोरोना रुग्णांना आणि अन्य रुग्णांना आपुलकीने हॉस्पिटलमध्ये नेण्याचे तसेच हॉस्पिटलमधून घरी आणण्याचे कार्य माधुरी जाधव करत आहेत.त्यांच्या कार्याला बेळगाव लाईव्हचा कडक सॅल्यूट.
या महिलेने उचलला विडा-कोविड विरुद्ध देण्यासाठी लढा -माधुरी जाधव कोरोना युद्धात पुरुषांच्या बरोबरीने करताहेत काम -हातात…
Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 13, 2020