बेळगाव शहरालगतच्या महत्वाच्या ग्राम पंचायतीपैकी एक ग्राम पंचायत म्हणजे हिंडलगा ग्रामपंचायत होय.
आगामी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुकीच्या पद्धतीनं वार्ड पुनर्रचना करण्यात आली आहे अशी तक्रार हिंडलगा आणि विजयनगर भागातील ग्रामस्थांनी केली आहे.जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे.
हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीत विजय नगर मधील भाग येतो या ग्राम पंचायत निवडणुकीसाठी होणारी प्रभाग पुनर्रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे सदर पुनर्रचना पहिल्यास अनेक संशय निर्माण झाले आहेत कोणत्याही पद्धतीनं एका गटाने निवडणुकीत विजय मिळवण्याचा हेतू समोर ठेऊन ही प्रभाग पुनर्रचना झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
विजयनगर रक्षक कॉलनी हिंडलगा प्रभाग 10 मध्ये येतो या कॉलनीतील अनेक मतदार चुकीच्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रभागात घालण्यात आले आहेत.
अनेक बाहेरील मनपा कार्यक्षेत्रातील नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत अनेक इच्छुकाना देखील या प्रभागात अर्ज भरता येणार नाही अशी सोय या मतदार यादीत करण्यात आली आहे असे देखील हिंडलगा विजयनगर ग्रामस्थांनी म्हटलं आहे.
जर का प्रभाग पुनर्रचना आणि मतदार न बदलल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी देखील चालवण्यात आली आहे.निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी हिंडलगा ग्राम पंचायतीत वार्ड पुनर्रचना आणि मतदार याद्या नवीन करा अशी मागणी करण्यात आली आहे.