कोरोना सारख्या महामारीमुळे सारेजण भयभीत झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना मदत करणे आणि त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी प्रशासनाबरोबरच अनेक संस्था पुढे आल्या आहेत. मात्र कधीही आपले नाव पुढे न आणता काम करणारे देखील बरेच आहेत. अशीच एक व्यक्ती जी सिलेंडरचा पुरवठा विविध संघटनेच्या माध्यमातून करते त्या व्यक्तीचे नाव आहे वेंकटेश पाटील.
सर्व देशभर (साथीचा रोग) सर्वत्र सुरूवात झाली असल्याने एक नवीन नियम त्यापासून होणारे बचाव बरंच काही पाहायला मिळालं आणि शिकायलाही. मात्र अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडणे कठीण असताना देखील रुग्णांसाठी काम करणारे व्यंकटेश पाटील यांनी रुग्णांना बरीच मदत केली आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून खाजगी इस्पितळे आणि सरकारी इस्पितळात सिलिंडरचा पुरवठा ते करताहेत.
आतापर्यंत 1882 सिलेंडर त्यांनी पुरविले आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. अजूनही त्यांची ही सेवा कार्यरत आहे.
ऑक्सिजनच्या अलीकडील कमतरतेबद्दल प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यानंतर ऑक्सिजन सिलिंडर्स पुरवण्यासाठी अनेक संघ संस्था पुढे आले आहेत.
बेळगाव येथील व्यंकटेश पाटील यांनी कोणतीही फी न घेता मोफत रित्या सिलेंडर पुरवठा केला आहे. ते अजूनही आपल्या कामासाठी धडपडत आहेत.
हे सर्व सिलिंडर कोविड केअर ग्रुप, जनसेवा कोविड सेंटर, फेसबुक फ्रेंड्स सर्कल अशा विविध स्वयंसेवी संस्थांकडून पुरविण्यात येतात. त्या माध्यमातून रुग्णांची सोय करण्यात येते. त्यांनी शुक्रवारी दोन सिलेंडर ऑक्सीजनसाठी दिले आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. जे सिलिंडर खाली होतात ते भरून पुन्हा रुग्णांच्या सेवेसाठी ते दाखल करतात. फॅक्टरी नेऊन ते भरून इस्पितळात अथवा गरजूंना ते देत आहेत. त्यांची ही सेवा अविरतपणे सुरू आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सेवेबद्दल सलाम.