कोरोना महामारीमध्ये अनेक उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. तर आता कोरोनातून बाहेर पडतो न पडतो ते बँक धारक आणि इतर काही त्रास करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हा त्रास थांबवावा अशी मागणी करण्यात आली.
सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. कोरोनामुळे बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगारीमुळे आम्ही विविध फायनान्स कंपन्यांमध्ये काम करत होतो. सर्वसामान्य जनतेकडून पैसे जमा करून त्या कंपनीमध्ये भरत होता.
मात्र काही कंपन्यांना समस्या निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे एजंट धारकांना गुंतवणूक दार बास करत आहेत. मात्र गुंतवणूक धारकांनी कोरोनाची परिस्थिती जाणून घेवून आम्हाला सहकार्य करावे, अशी मागणी बेळगाव जिल्हा बेरोजगार संघटनेच्यावतीने करण्यात आली.
पॅनकार्ड तसेच कंपन्यांमध्ये आम्ही काम केले. जनतेचे पेसे त्याकंपनीमध्ये गुंतविले. अनेकांना त्याचा परतावा मिळाला. मात्र काही कारणांमुळे अनेकांना रकम मिळाली नाही. त्यामुळे हे गुंतवणूकदार एजंटांकडे येवून त्रास करत आहेत.
सध्या अनेक प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकली आहेत. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेंव्हा आम्हाला सहकार्य करावे, अशी मागणी या एजंटांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.