बेळगाव तालुक्यात उद्योग खात्री या योजनेतून मोठ्या प्रमाणात तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. या तलावामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन त्याचा उपयोग शेतकर्यांना होणार आहे. मध्यंतरी सरकारने याबाबत विचारविनिमय सुरू केला होता. मात्र सध्या बेळगाव तालुक्यात 20 तलावांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
यामुळे अनेक तलावांची खोदाई करून त्याच्यात पाणी व क्षमता वाढवून त्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीसाठी व्हावा हा दृष्टिकोन आहे. तालुका पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी याबाबत दक्षता घेऊन उद्योग खात्रीतुन कामगारांना काम मिळावे व याचा लाभ शेतकऱ्यांना ही व्हावा या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले आहे.
बेळगाव तालुक्यात आतापर्यंत 20 तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. ही सर्व कामे उद्योग खात्रीतुन करण्यात आली आहेत. त्यामुळे यापुढे पाणी आडवा पाणी जिरवा हि योजना बारगळली अतरी तलावे निर्मिती करा आणि जलसाठा वाढवा ही नवीन योजना अंमलात आल्याचे दिसून येत आहे. बेळगाव तालुक्यातील अनेक गावांत तलाव खोदून त्यामध्ये पाणी साठा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एकीकडे जमिनीतील पाणी साठा कमी होत असताना उद्योग खात्रीच्या माध्यमातून पाणी साठा वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त होत असले तरी अजूनही याबाबत समाधान व्यक्त होत असली तरी अजूनही याबाबत सखोल अभ्यास करून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध व्हावा याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. सध्या बेळगाव तालुक्यातील 20 तलावांमध्ये भरपूर पाणी साठले आहे.
त्यामुळे जलस्त्रोत वाढविण्याच्या दृष्टिकोनातून हे उपयोगाचे ठरणार आहे. या कार्याबद्दल अंकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.