बेळगावात दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत आहे. शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचे कामकाज सुरु आहे. खोदकाम ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. या सर्व गोष्टींमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
यासंदर्भात आज आमदार अनिल बेनके यांनी रहदारी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बेळगावमध्ये होत असलेली वाहतूक समस्या यावर त्वरित तोडगा काढून उपाययोजना अमलात आणाव्या, तसेच शहरातील वाहतुकीच्या समस्यांबाबत लक्ष पुरवून वाहतूक नियंत्रण करण्याचा सल्ला दिला.
यावेळी आमदार अनिल बेनकेंनी एनएच ४ संकम हॉटेल ते अशोक सर्कल पर्यंत सुरु असलेल्या स्मार्ट सिटी कामांची पाहणी केली. आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली हि कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आमदारांनी केली शाळेची पाहणी
केंद्र आणि राज्य सरकारने सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. अनेक ठिकाणच्या शाळांच्या इमारतींची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बेळगाव शहर आणि तालुक्यातही अनेक सरकारी शाळांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे.
शहरातील सरकारी शाळा क्रमांक ३० येथे शाळेच्या नूतनीकरणाचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. या शाळेत आज आमदार अनिल बेनके यांनी भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. या शाळेच्या वरील मजल्यावर नवीन वर्गखोल्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच शोउचलायचीही बांधणी करण्यात आली आहे. या नूतनीकरणासाठी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामकाजासह शाळेतील डेस्क, मैदान, पाण्याची व्यवस्था, फळा, शाळेची इमारत, खिडक्या आणि स्वच्छता गृहांचीही पाहणी वैयक्तिकरित्या आमदार अनिल बेनकेंनी केली.
सरकारी शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकारच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सरकारच्या वतीने निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा उपयोग शाळेतील पायाभूत सुविधांसाठी उपयोगात आणण्यात येणार आहे.
आज ज्याप्रमाणे या शाळेला भेट देऊन पाहणी करण्यात आली, त्याचप्रमाणे इतर सरकारी शाळांना भेट देऊन तेथील पायाभूत सुविधा आणि नूनातीकरणाची पाहणी करण्यात येणार आहे. शिवाय ज्याठिकाणी शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे टायची पूर्तता करण्यासाठी आमदार स्वतः प्रयत्न करतील, असे आश्वासनही आमदार अनिल बेनके यांनी दिले आहे.