Friday, April 26, 2024

/

वडगाव येथे गणेश मंदिरात चोरी

 belgaum

मागील काही महिन्यांपासून चोरटे मंदिरांना लक्ष करत आहेत. मागील महिन्याभरात लक्ष्मी मंदिरांमध्ये चोरी करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व इतर साहित्य पळविले होते. आता संभाजीनगर वडगाव येथील मंदिरात चोरट्यांनी देवाच्या मूर्तीवरील चांदीचा किरीट लंपास केला आहे.

त्यामुळे देवही सुरक्षित राहिले नाहीत असे दिसून येत आहे. संभाजी नगर वडगाव येथील श्री सार्वजनिक गणेश मंदिरात चोरीचा हा प्रकार घडला आहे. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत परिसरात खळबळ माजली असून चोरट्यांचा माग काढून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी होऊ लागली आहे.

सध्या शहर आणि उपनगरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे तर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान ठेवले आहे. घरफोड्या चोऱ्या याचबरोबर दरोडे सारखे प्रकार घडत आहेत. याकडे पोलिसांनी लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे. वडगाव येथे यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. मात्र याकडे कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतची माहिती शहापूर पोलिसांना देण्यात आली आहे.

 belgaum

संभाजी नगर वडगाव येथील श्री सार्वजनिक गणेश मंदिर व सांस्कृतिक ट्रस्ट येथे असलेल्या मूर्तीच्या किरीटाची चोरी करण्यात आली आहे. याचबरोबर शहर आणि परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून आता चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.