एका दिवसात दोन घरफोड्या सात लाखांची चोरी बेळगाव शहर आणि तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. एका दिवसात दोन घरफोड्या करण्यात आल्या असून तब्बल सात लाखांचा ऐवज पळविण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनसमोर चोरट्यांचे आव्हान उभे ठाकले आहे.
केएचबी कॉलनी बसवन कुडची येथे भरदिवसा पाच लाखाची घरफोडी झाली आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली आहे. यासंबंधी सरला सुभाष नेसर्गी यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
सरला या शिक्षिका आहेत. त्यांना आणण्यासाठी सायंकाळी चार वाजता त्यांचा मुलगा गेला असता तब्बल अडीच तासात चोरट्यांनी आपला डाव साधला आहे. सुमारे पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविली आहे तर दुसरी घटना पंतनगर येथील एका माजी सैनिकांच्या घरात घडली आहे. पाठीमागील दरवाजा फोडून चोरट्यांनी दोन लाखांचा ऐवज पळविला आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. यासंबंधी मल्लाप्पा बसप्रभू मंगोजी यांनी मारहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
मंगळवारी सायंकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. मल्लापा यांच्या घरातून 38 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख वीस हजार रुपये चोरट्याने पळविले आहेत. सध्यातरी चोरटे सक्रीय झाले असून पोलीस प्रशासन निष्क्रिय होत असल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही घटना मंगळवारी घडली आहेत.
एका माजी सैनिकाच्या घरातील दोन लाख आणि बसवन कुडची येथील पाच लाख रुपये चोरी करण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली असून पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.