तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अलतगा क्रॉसजवळ असलेल्या हॉटेलमध्ये सिलिंडर आणि स्वयंपाकाच्या सामानाची चोरी झाली आहे.
गेल्या 2 महिन्यापासून सतत होत असलेल्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
अलतगा क्रॉसजवळील आनंद पाटील यांच्या हॉटेलमध्ये शुक्रवारी ही चोरी झाली असून कंग्राळी-कडोली मार्गावर असलेल्या हॉटेलमध्ये अंदाजे 40 हजार रुपये किंमतीच्या वस्तूंचा समावेश आहे. या घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी येथील लक्ष्मी मंदिरात देखील चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. आता भरदिवसा चोरी होत असून याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.