सर्वसमावेशक शिक्षण योजनेंतर्गत सन २०२०-२१ या सालासाठी कित्तूर, खानापूर, आणि रामदुर्ग परिसरातील रिक्त असलेल्या सरकारी शाळेतील शिक्षकांच्या पदासाठी तात्पुरत्या तत्वावर भरती करण्यात येणार आहे.
तरी नियमावलीनुसार पात्र उमेदवारांनी संबंधित विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष डीएड. (प्राथमिक) आणि विशेष बीएड. (माध्यमिक) अशी पदवी प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. प्रमाणपत्रांसह संबंधित खात्याकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.