Wednesday, December 25, 2024

/

जनतेच्या मनात भीती आहे त्या ट्रॅफिक पोलिसांवर करा-

 belgaum
Adv harsh patil
Adv harsh patil

गुरुवारी बी. एस. येडीयुराप्पा मार्गावर रहदारी पोलिसांनी दुचाकीस्वाराला अडवून कारवाईच्या नावाखाली त्या युवकाला मारहाण केली. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असुन सदर प्रकारावर जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंदर्भात सदर युवकाला न्याय मिळावा, दक्षिण रहदारी पोलीस विभागातील संबंधित रहदारी पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी पिरनवाडी येथील वकील हर्षवर्धन पाटील आणि इतर नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

केंद्रीय रहदारी आणि वाहतूक विभागाने अधिसूचना जारी केली आहे. कागदपत्रे नूतनीकरणासाठी अवधी वाढवून दिला आहे. कोविड मुळे सामान्य जनता आर्थिक अडचणीत सापडली आहे. आणि अशातच बेळगावच्या रहदारी पोलिसांकडून 4-5 जणांच्या समूहाने हेल्मेटसक्ती, कागदपत्रांसाठी नागरिकांना वेठीला धरण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात येत आहे.

गुरुवारी झालेल्या प्रकारानंतर कायदा हातात घेतलेल्या रहदारी पोलिसांच्या विरोधात नागरिक संतापले असून संबंधित युवकाला न्याय मिळण्यासाठी दक्षिण विभाग रहदारी पोलिसांची सदर प्रकरणात चौकशी करण्याची तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

बेळगावची जनता पोलिसांना नेहमीच सहकार्य देत आली आहे. परंतु काही पोलिसांकडून जनतेला असहकार्याची वागणूक दिली जाते.

कायदा हा सर्वांसाठीच समान आहे. रहदारी आणि वाहतूक विभागाच्या नियमात दंड आकारण्याची सूचना असेल तर रहदारी विभागाने जरूर दंड आकारावा, कारवाई करावी. परंतु केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या अधिसूचनेविरोधात जाऊन कायदा आपल्या हातात घेऊन कारवाई करण्यात आली, तर मात्र जनता गप्प बसणार नाही. अशा प्रकारांवर जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून योग्य ती पावले उचलावीत यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.

 

मारहाण करणाऱ्या त्या रहदारी पोलिसां विरोधात अद्याप गुन्हा का नाही?कोविड काळात वाहनांची कागदोपत्र मुदतवाढ करायची गरज नाही-सामाजिक कार्यकर्ते वकील हर्षवर्धन पाटील यांनी पोलीस उपायुक्तांकडे मागणी
#advharshpatil
#takeactionagainsttrafficpolice
#livebelgaum
#dcptraffic
#copsbelgaum

मारहाण करणाऱ्या त्या रहदारी पोलिसां विरोधात अद्याप गुन्हा का नाही?कोविड काळात वाहनांची कागदोपत्र मुदतवाढ करायची गरज…

Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 19, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.