कोरोनाच्या महामारीमुळे सगळे सण समारंभ यात्रा उत्सव रद्द झाले आहेत त्यातच शाळा कॉलेज देखील बंदच आहेत.वर्षातुन एक होणाऱ्या शिक्षक दिनाला देखील निर्बंध आले आहेत.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन दरवर्षी 5 सप्टेंबर हा टीचर्स डे म्हणून साजरा केला जातो शाळकरी मुलं आपापल्या टीचरला गुलाबाचं फुल देऊन हॅपी टीचर्स डे म्हणत असतात अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे.
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने हा सीन यावर्षी हे सगळं मिसिंग असणार आहे.मात्र सर्वच विद्यार्थ्यानी आपापल्या गुरूंना डिजिटली ऑनलाइन शुभेच्छा देत यंदाचा शिक्षक दिन साजरा करण्याचे ठरवले आहे.
ऑनलाइन अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी यावेळी गुगल सर्च करून अनेक गुलाबाची फुल व्हाट्स अप्प फेस बुक किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवली आहेत काहीनी तर ग्रेटींग कार्ड्स पोस्ट द्वारे पाठवली आहेत.
ज्ञान देणाऱ्या शिकवणाऱ्या गुरूंचा आदर करण्यासाठी साजरा होणारा शिक्षक दिनी यावर्षी वेगळ्या पद्धतीनं साजरा होतोय गुरुजनांचा आदर करणारी ही भारतीय संस्कृती टिकली पाहिजे.
34 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
बेळगाव जिल्हा शिक्षण खात्याच्या वतीनं देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी 34 शिक्षकांना देण्यात येणार आहेत. आज सकाळी 10 वाजता कॅम्प मधील सेंट अंथोनी शाळेत साध्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
34 पैकी 6 मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना हे आदर्श पुरस्कार वितरण केले जाणार आहेत.शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या पुरस्कारात खानापूर येथील मराठा मंडळ ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास बी देसाई,अनगोळ येथील मराठी शाळेच्या सह शिक्षिका जयश्री मनोहर पाटील,बसुरते शाळेच्या शिक्षिका रेखा रेणके खानापूर येथील उच्च प्रायमरी शिक्षिका आर बी बाँदीवडेकर, भालके के एच येथील शिक्षक सूर्याजी पाटील व नंदगड कन्या हायस्कूलचे शिक्षक सूर्याजी पाटील यांचा समावेश आहे.
वरील सहा मराठी माध्यमाच्या व्यतिरिक्त एकूण 34 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे.