बेळगाव पोलिसांनी शुक्रवारी तीन विविध ठिकाणी गांजा विक्री करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला असून कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे डी सी पी विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली गांजा विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे.
या कारवाईत अत्तरअल (२१, रा. खोगा, आसाम, सध्या राहणार : ऑटोनगर) आमिर शेख (२०,रा. मरगुर, इंडी, सध्या राहणार : ऑटोनगर, बेळगाव), सादीक तड्कोड (३३, रा. न्यू गांधी नगर, बेळगाव),
ओंकार पवार (३०, रा. मारुतीनगर, बेळगाव), सुरज हिंगलगेकर (१९, रा. दुर्गा माता रोड, जुने गांधीनगर, बेळगाव), अलीब्बास बुकारी (३३, रा. आश्रय कॉलनी, रुक्मिणी नगर, बेळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींकडून अंदाजे ९०,००० किमतीचा ५ किलो ६९० ग्रॅम वजनाचा गांजा, तसेच रोख ११ हजार रुपये आणि ४ मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.