काकती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गौंडवाड गावाजवळील शेतामध्ये जुगार खेळणारया अडडयावर धाड घालून सात जुगाऱ्याना अटक करण्यात आली. या वेळी 24 हजार 700 रुपये जप्त करण्यात आले.
बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. बेळगाव सीसीबीआय पोलिस निरीक्षक संजीव कांबळे आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे बाकी फरारी झाले आहेत.
अटक करण्यात आलेल्या मध्ये बी.के. कंग्राळी संगमेश्वरनगरचा सुरेश इरापा बुडरी, संतोष चंद्रकांत पाटील यललापा कणापा बडकणावर गंगाराम बडकणावर यांचा समावेश आहे. यमनापूर येथील संजू फकिरा गस्ती आणि कुमार नाईक हे फरारी झाले आहेत.
सुरेश इराप्पा लमाणी ( वय 37 ), मल्लेश सत्याप्पा बुड्री ( वय 30, दोघेही रा. कंग्राळी बी. के.), यल्लाप्पा कन्नाप्पा बडकण्णावर ( वय 30, रा. हुंचेनट्टी ) , संतोष चंद्रकांत पाटील ( वय 31, रा. कंग्राळी बी.के. ), गंगाराम सिध्दाप्पा बडकण्णावर ( वय 38, रा. मुत्यानट्टी ) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.
या संबंधी एकूण सात जणांवर काकती पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायदा 87 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. संजू फकिरा गस्ती, कुमार नाईक ( दोघेही रा. यमनापूर ) अशी पलायन केलेल्या दोघा जणांची नावे आहेत . पोलिसांनी छापा टाकताच संजू व कुमार यांनी तेथून पलायन केले. तर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. गौंडवाड गावापासून दोन कि.मी. अंतरावर शेतवडीत असलेल्या जनावरांच्या शेडजवळ अंदर – बाहर जुगार खेळताना ही कारवाई करण्यात आली आहे.