बेळगाव तालुक्यातील हलगा गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांना चारवण्यासाठी ७ एकर गायरान जमिनीसहित, पशु वैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री येडियुरप्पा याना निवेदन देऊन केली दिले.
सोमवारी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमलेल्या हलगा गावाच्या ग्रामस्थांनी त्यांच्या मागणीची पूर्ततेचा आग्रह करुन निदर्शने केली. या वेळी त्यांनी घोषणाबाजी करुन, गायरान जमीन तसेच पशु वैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी केली.
हलगा गावातील लोक कृषी आणि दुग्ध व्यवसायावर आपले जीवन जगत आहेत. त्यामुळे सरकारने त्वरित हलगा गावातील सर्वे क्रमांक २६२/७ मधील सात एकर जमीन जनावरांना चरण्यासाठी द्यावीत तसेच पशु वैद्यकीय दवाखाना सुरु करण्यात
यावा. यापूर्वी काही संघ संस्थांना जागा देण्यात आली आहे. या जागेवर काहींनी अतिक्रमण देखील केले आहे असा आरोप हलगा ग्रामस्थांनी व्यक्त केला.
त्यानंतर ग्रामस्थांनी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा याना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आपल्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी वकील अण्णासाहेब घोरपडे, वाय के दिवटे, बसय्या हिरेमठ, महावीर बेल्लद, के के संताजी, चंद्रकांत कानोजी आणि प्रकाश लोहार आदी उपस्थित होते.