मणगुत्ती आणि पिरनवाडी येथे पुतळ्यासंदर्भात आज “सकल मराठा क्रांती मोर्चा बेळगाव” यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
या पत्राची प्रत गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुराप्पा, गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनाही पाठवण्यात आली आहे.
या पत्रात मणगुत्ती आणि पिरनवाडी येथे आजपर्यंत झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणानंतर काही समाजकंटकांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
तसेच रातोरात संगोळी रायण्णा यांचा पुतळा उभारण्यास परवानगी कुणी दिली? असा सवाल या पत्रात उपस्थित करण्यात आला आहे.
कोविडच्या संकटकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या दोन्ही प्रकरणात सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.