राज्यात अमली पदार्थ तस्करी आणि विक्रीसंदर्भात अनेक प्रकरणे पुढे येत असून या ड्रग्ज् तस्करी रॅकेटमध्ये सहभाग असणाऱ्यांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मत जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे. या रॅकेटमध्ये कुणाचाही सहभाग असो, त्यांची गय करता काम नये. शिवाय कुणाचाही बचाव यात करता कामा नये, असे मत रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
या रॅकेटमध्ये अनेक मोठ्या मंडळींचाही सहभाग असण्याची शक्यता आहे. या रॅकेटमध्ये अनेक लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. हे ड्रग्ज माफिया आपल्या सभोवतीही असू शकतात. कदाचित अशा लोकांसोबत माझाही फोटो असू शकेल, परंतु मी त्यात सहभागी असेन, असा याचा अर्थ होत नाही. त्यामुळे पत्रकारांनी कोणताही दुसरा अर्थ काढू नये आणि कल्पनाविश्वात जाऊन चुकीच्या समजुती पसरवू नयेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
यावेळी पुरामध्ये नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले कि, नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण करण्यात येत असून, याबद्दलचा अहवाल आल्यानंतर त्वरित नुकसान भरपाई देण्यात येईल. कोणावरही अन्याय होणार नाही, याची दखल घेतली जाईल, असेही रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.