पाऊस आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांचे आणि पुलांचे बांधकाम संबंधित स्थानिक प्रशासनाने २२ सप्टेंबरच्या आत सुरु करावे, यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती, सार्वजनिक बांधकाम आणि समाजकल्याण मंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम आणि समाजकल्याण खात्याच्या वतीने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
बेळगाव आणि धारवाड परिसरातील रस्ते आणि पुलांच्या बांधकामाला प्रारंभ केला पाहिजे. तसेच या कामकाजासाठी संबंधितांनी निविदा नोटीस जाहीर करावी आणि निविदा प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी,
आणि अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून हि कामे त्वरित पूर्ण करून घ्यावीत अशाही सूचना दिल्या आहेत. याचप्रमाणे चिकोडी विभागातील कामांविषयीही संपूर्ण माहिती द्यावी, असे सुचविण्यात आले आहे.
या बैठकीस आमदार महांतेश दोड्डगौड, प्रमुख अभियंते एस. एफ. पाटील यांच्यासह गदग, बागलकोट, धारवाड, कावेरी, कारवार आणि शिर्सी क्षेत्रातील सार्वजनिक कल्याण व समाज कल्याण विभागातील अधिकारी उपस्थित होते.