जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर होताच अनेक बड्या नेत्यांनी आता आपले लक्ष या बँकेकडे वळवले आहे.
या बँकेची निवडणूक जिंकून जो कोणी विजयी होईल त्याचीच सत्ता चालणार असे समजले जाते. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकडे आता साऱ्या नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अनेक जण आतापासून मोर्चेबांधणी करत आहेत तर ही निवडणूक दिनांक 7 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे. त्यामुळे आतापासूनच सभासदांच्या भेटीगाठी वाढवून आपला पॅनल बँकेवर बसवण्यासाठी बडे नेते कार्यरत झाले आहेत.
जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. यापूर्वीही ही बँक माजी खासदार रमेश कत्ती यांच्या ताब्यात होती. मात्र उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून या नेत्यांबरोबरच अनेक जण आपला ताबा मिळवण्यासाठी सरसावले आहेत. या बँकेच्या निवडणुकी नंतरच राजकारण ठरते.
यापूर्वीही पी एल डी बँकेच्या राजकारणावरून राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या आणि बँकेच्या निवडणुकीदरम्यान मोठा आगडोंब उसळला होता. आता जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर झाल्याने निवडणुकी वरूनच पुन्हा सरकारच्या विरोधात कोण बंड करणार का? हे समजणार आहे. बेळगाव जिल्ह्यात दिनांक 7 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकडे बड्या नेत्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे ही निवडणूक होईपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पॅनेल आणि त्यानंतर चे राजकारण याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
कोरोना महामारीमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने त्याची तारीख जाहीर केली आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आतापासूनच अनेकजण हालचाली करत आहेत. तर काहींनी सबंधित मतदारांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. ही निवडणूक कोण जिंकणार याकडे मात्र सार्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.