तब्बल एकशे दहा कोटी रुपये परिवहन महामंडळाला कोरोना काळात फटका बसला आहे. त्याची पूर्तता भरून काढण्यासाठी आता बरेच दिवस उलटणार आहेत. मात्र आंतरराज्य बस सेवा बंद असल्याने ही हा फटका सहन करावा लागला आहे. याचा विचार करून कर्नाटकातून आता महाराष्ट्रात 22 सप्टेंबर पासून बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.
कर्नाटक परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला असून या बस सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात झालेले नुकसान भरून काढता येईल हा उद्देश आहे. केवळ बेळगाव जिल्ह्यातून कर्नाटक परिवहन महामंडळाला 110 कोटींचा फटका बसल्याने इतर राज्यात हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक मार्ग सूचनेनुसार अंतराचा प्रवास यांवरील निर्बंध हटविले होते. मात्र सरकारी बसेस द्वारे पुरविण्यात येणारी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली नव्हती.
या दरम्यान आता बेळगावातून महाराष्ट्रात जाण्यासाठी 22 सप्टेंबर पासून बससेवा सुरू करण्यात येणार असल्याने प्रवासातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव परिवहन महामंडळाने याआधी गोवा आणि इतर आंतरराज्य बस सेवा सुरू केल्या होत्या. आता महाराष्ट्रात ही बससेवा सुरू होणार असल्याने प्रवासातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी काही सुरक्षा मार्ग सूचीही अवलंबण्यात येणार आहे.
या यादरम्यान कोरोना महामारीचे नियम पाळूनच या बस सुरु करण्यात येतील. त्यामुळे याचा विचार करून प्रवाशांनी प्रवास करावा असे आवाहनही करण्यात आले आहे. बेळगाव महाराष्ट्र बस सेवा सुरू झाल्याने मोठा दिलासा प्रवाशांना मिळणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.