मागील काही वर्षापूर्वी बेळगाव बागलकोट विजापूर सह उत्तर कर्नाटकात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्या दहशतीमुळे नावारूपास आलेल्या आणि विविध गुन्हे केलेल्या टायगर ग्रुप मधील 9 जणांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कोका गुन्ह्याखाली ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या बारा वर्षांपूर्वी खून, खुनी हल्ला दरोडा खंडणी वसुली आधी प्रकरणी ही गँग कार्यरत होती. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा ही गॅंग सक्रिय झाली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी पोलीस उपाधीक्षक शंकरगौडा पाटील, मंडळ पोलीस निरीक्षक गोपाल राठोड आदींच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली.
गोकाक येथे ही कारवाई करण्यात आली आहे. हे सर्वजण एका कितीला राहणारे आहेत. पोलिसांनी 13 ठिकाणी छापे टाकून नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. सर्वजण 20 ते 45 वयोगटातील आहेत. 2006 मध्ये टायगर गॅंग अस्तित्वात आली होती. खुनी हल्ला खून दरोडा आधी गुन्ह्यांमध्ये ते सक्रिय होते.
उत्तर कर्नाटका त्यांनी धुमाकूळ घातला होता. 2008 साली अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस यांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर काही वर्षे ही थोडी थंडी होती. आता पुन्हा ही टोळी सक्रिय झाली आहे. नऊ जणांना अटक करून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तीन महिने एका विशेष पोलीस पथकाने तपास करून ही कारवाई केली आहे.