बेळगावच्या नव्या डीसीपी पदी नियुक्ती करण्यात आलेल्या डॉ. विक्रम आमटे यांनी आज आपल्या कार्याची सूत्रे स्वीकारली. डीसीपी विक्रम आमटे हेमूलचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथील असून राज्य शासनाने त्यांच्या नियुक्तीचा आदेश गुरुवारी बजाविला होता.
यापूर्वी डीसीपीपदी असलेल्या आयपीएस अधिकारी सीमा लाटकर यांची नुकतीच बदली करण्यात आली होती. त्यानंतर हे पद रिक्तच होते. या जागी विक्रम आमटे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे.
डीसीपीपदी नियुक्ती झालेले विक्रम आमटे यांनी मंगळूर येथे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून सेवा बजाविली आहे. त्यानंतर ते आता बेळगावच्या पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्तपदी सेवा बजाविणार आहेत.
डीसीपी सीमा लाटकर यांच्या बदलीनंतर राज्य पोलीस व्यवस्थापन खात्याचे सचिव भुवनेंद्र कुमार यांनी हा आदेश बजाविला होता. त्यानंतर या पदाचा कार्यभार आज विक्रम आमटे यांनी स्वीकारला आहे.
नेमकं काय म्हणाल्या सीमा लाटकर-वाचा फक्त बेळगाव live