बेळगावचे चार वेळा खासदार पद भूषविलेले आणि सध्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाले आहे.निधना समयी ते 64 वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे ते व्याही होते.
त्यांना कोरोनाची बाधा झाली होती गेल्या 11 सप्टेंबर रोजी ते कोरोना पोजिटिव्ह आले होते त्या नंतर त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
गेल्या तीन दिवसापूर्वी ते अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर होते. मंगळवारी रात्री बेळगाव शहराच्या जिल्ह्याच्या आणि उत्तर कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अंगडी यांनी 2004 पासून आता पर्यंत चार वेळा बेळगाव शहराचे खासदार पद भूषवले होते.2019 मध्ये चौथ्यांदा निवडून आल्यावर त्यांना केंद्रात मोदी सरकार मध्ये त्यांना रेल्वे राज्य मंत्री देण्यात आले होते.बेळगाव जिल्ह्यात भाजप बळकट करण्यात अंगडी यांचा सिंहाचा वाटा होता.आता पर्यंत बेळगाव साठी चार वेळा निवडून आले होते.
1999 साली भाजप महानगरचे अध्यक्ष होते 2004 साली पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले बेळगाव तालुक्यातील के ले कोप जवळील नागेरहाळ गावचे ते मूळचे रहिवाशी होते.